सर्वसाधारण 

  1. home
  2. सर्वसाधारण 
  3. जीवनाचे सप्तसूर
225 250
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

जीवनाचे सप्तसूर

By: डॉ. श्री. ग. बापट ,

Book Details

  • Edition:2021
  • Pages:१४० pages
  • Publisher:पँँरँँमाउंट प्रकाशन
  • Language:Marathi
  • ISBN:----

सेवानिवृत्तीनंतर लेखन-वाचन-मनन-चिंतन या भावनेतून निर्मिती झालेल्या या पुस्तकाबद्दल लेखकाच्या मनात अभिमानभाव जाणवतो. 'लेखन' हा लेखकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्याचे या पुस्तक निर्मितीचे महत्वाचे कारण म्हणता येईल.

आपले आयुष्य घडवायला ज्यंनी बहुमुल्य योगदान दिलं त्या शिक्षकांचा आणि आदर्श व्यक्तींचा पुस्तकाच्या सुरवातीला उल्लेख करून लेखकाने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. काही हृदयस्पर्शी तर काही आव्हानात्मक आयुष्याचे वर्णन करणारे किस्से या पुस्तकात प्रकरणांच्या स्वरुपात आले आहेत.

' ती काळरात्रच ठरली ' या कथानकातून जिवलग मित्राच्या झालेल्या अकस्मात अपघाती निधनामुळे लेखकाच्या त्याकाळी झालेल्या उद्विग्न अवस्थेची जाणीव होते. आपल्या खुमासदार शैलीतील वक्तृत्व गुणामुळे लेखकाचे मन भारावून टाकणाऱ्या सुरेश हुंदरे सरांच्या भेटी दरम्यान घडलेल्या किस्स्यांचा खजिना आजही लेखकाने आठवणींच्या रूपाने जपला आहे. लोकमान्य टिळकांच्या पवित्र स्मृतीच्या निमित्ताने नेतृत्व, कर्तुत्व, वक्तृत्व आणि दातृत्व या चार गुणांमुळे सर्वसामान्य जनतेने लोकमान्य या पदवीने गौरवलेल्या बाळ गंगाधर टिळकांचा लोकोत्तर नेते म्हणून उल्लेख केला आहे.

आपल्या मूल्य संस्कृतीच्या जपणुकीची ती वाढविण्याची विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, ही शिकवण शालेयीन वयापासून विद्यार्थ्यांच्या अंगी बाणली जावी अशी लेखकाची आग्रही भूमिका असल्याचे जाणवते. निश्चित असे ध्येय आणि ते प्राप्त करण्यासाठी सततचे प्रयत्न याचा आग्रहदेखील शिक्षणाचा एक भाग असावा अशी लेखकाची आग्रही मागणी लिखाणातून जाणवते.

पुस्तकाच्या उत्तरार्धात यशस्वी व्यवस्थापन, यशस्वी जीवन, प्रेमबंधन आणि यशस्वी पालकत्वाविषयी आपल्या पूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकांंमधून आलेले आपले बहुमुल्य विचार लेखकाने मांडले आहेत, जे आजच्या काळाची गरज आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

डॉ. श्री. ग. बापट