तत्वज्ञान

  1. home
  2. तत्वज्ञान
  3. आध्यात्माचा स्व-भाव
225 250
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

आध्यात्माचा स्व-भाव

आध्यात्म शोधा रोजच्या जगण्यात By: दिलीप देवधर ,

Book Details

  • Edition:1st edition 2022
  • Pages:172 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-81-85262-45-6

प्रस्तुत पुस्तकातून लेखकाने आध्यात्माचा व्यक्तीनिष्ठ आभ्यास करताना मानवी प्रवृत्तीतून जाणवणाऱ्या त्याच्या दोन प्रकारच्या प्रतिमांचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आढळतो.

प्रत्येकाच्या अंगी असलेला मीपणा स्वतःच्याच साहाय्याने सोडून स्वतःमधे सातत्याने फलदायी सुधारणांचा अवलंब करणे म्हणजेच अध्यात्म अशी साधी पण अतिशय उद्बोधक अशी आध्यात्माची व्याख्या केली आहे. आयुष्यात पेलावी लागलेली आव्हानातून प्रत्येकाला त्याच्यातला मीपणा अवगत होत असतो. या मीपणाची सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन रूपं असतात,  त्यातूनच डॉक्टरांच्या मते आध्यात्म हे जीवन जगण्याचे शास्त्र आणि तत्वज्ञान असा सकारात्मक विचार पुढे येतो.

नेहमी दुसरयांच्या चांगल्याचा हेवा करण्यात आणि दुर्गुणांचा तिरस्कार करण्यात आपले स्वतःच्या गुण-दोषांकडे दुर्लक्ष होत असते. अशावेळी दुसऱ्याला प्रमाणापेक्षा जास्त महत्व दिले जाऊन आपण स्वतःला पूर्ण दुर्लक्षित करतो. त्याएवजी स्वतःला ओळखण्यामध्ये आणि त्याद्वारे आपले मनोबल वाढ  प्रयत्न करीत राहणे, लेखकाच्या मते आध्यात्माची अशी देखील आध्यात्माची व्याख्या करता येईल. आणि त्यामुळे स्व-भावातून आध्यात्माचा ध्यास आणि आभ्यास या गोष्टींवर प्रस्तुत पुस्तकातून लेखकाने भर दिला आहे.

आध्यात्म म्हणजे काय असा प्रश्न कृष्णमूर्तींना विचारला असता त्यांनी आध्यात्म म्हणजे "स्वज्ञान" अशी आध्यात्माची एका शब्दात व्याख्या केली. मानवी मनालाही आध्यात्मात फार महत्व आहे, कारण आपल्यात निर्माण होणारा मीपणा याला सर्वस्वी कारणीभूत आपलं मन आहे. तसेच चांगले वाईट विचार मनात येणे, मन स्वैर होणे हे देखील मनावर अवलंबून आहे. त्यावर ताबा मिळविण्याचा उपाय हा आध्यात्मातून जातो याचे वर्णन गौतम बुद्धांच्या संदेशाचे उदाहरण देऊन लेखकाने परिणामकारकपणे मांडले आहे.

दिलीप देवधर

लेखक गेली 45 वर्षे अनेक कुटुंबांचे फँमिली डॉक्टर आहेत. सामाजिक कर्तव्य भावनेतून त्यांनी पुण्यातील नारायण पेठ व भूगाव येथे वृद्धाश्रम सुरू केले.कुटुंबविषयक