राज्यशास्त्र 

  1. home
  2. राज्यशास्त्र 
  3. भारतीय राज्यघटनेतील मूल्यव्यवस्था
175 195
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

भारतीय राज्यघटनेतील मूल्यव्यवस्था

By: प्रा.डॉ. बी. आर. जोशी ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:175 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-15-9

अधुनिक काळात राज्यघटनेतील मूल्यांबाबत आभ्यास करणे महत्वाचे ठरते कारण सामान्य नागरिकांमध्येही त्याबाबत चर्चा होताना दिसते. या मूल्यांबाबत जनतेमध्ये जागरुकताही निर्माण झालेली दिसते. प्रस्तुत पुस्तकाद्वारे एका तत्त्वचिंतकाने या मूल्यांचे सखोल आणि सुगम विवेचन केले आहे,  वाचकांना ते उद्बोधक ठरेल.

राज्यघटनेतील मुल्यांचा आभ्यास करताना त्यांचा परिणाम व लाभ दोहोंवर प्रभाव पडणारे समाज आणि राज्य हे घटक विचारात घेणे आवश्यक आहे. तसेच राज्यघटनेत वेळोवेळी समाविष्ठ केल्या गेलेल्या विविध मानवी मुल्यांचा आभ्यासही करणे क्रमप्राप्त आहे. लेखकाने या संकल्पनांचा नेमका अर्थ स्पष्ट करून त्यांचे तात्विक विश्लेषणही या पुस्तकाद्वारे केले आहे.

नव्याने समाविष्ट केलेल्या या मूल्यांसाठी घटनेत करण्यात आलेली तरतूद आणि त्यासंदर्भातील कायदेशीर बाजू यांची लेखकाने माहिती या पुस्तकाद्वारे दिली आहे. मानवी स्वातंत्र्य हे मुलभूत मूल्य मानून आणि त्यामागील मानवी वर्तनाचा उद्बोधक आभ्यास लेखकाने मांडला आहे. स्वातंत्र्याबरोबर येणाऱ्या कर्तव्य भावनेलाही लेखकाने तितकेच महत्व दिले आहे. संविधानातील व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा लेखकाच्या मते सर्वात मौलिक व महत्वपूर्ण अधिकार आहे.

लेखकाने या पुस्तकातून राज्यघटनेतील विविध अनुच्छेदांद्वारे स्वातंत्र्य, हक्क आणि जबाबदाऱ्या यांचे विवरण दिले आहे. प्रामुख्याने त्यात शिक्षणाच्या स्वातंत्र्याबद्दल मुलभूत अधिकारांबद्दल अतिशय उपयुक्त माहिती या पुस्तकातून दिली आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीप्रधान राष्ट्रामध्ये धर्म स्वातंत्र्य या मूल्याशी निगडीत भावनिकता या नाजूक विषयाची लेखकाने परिणामकारक मांडणी केली आहे. राज्यघटनेने नागरिकांना स्वातंत्र्य आणि हक्क प्रदान करताना त्यांचा अतिरेकी वापर केला जाऊ नये यासाठी, त्यांना कर्तव्यांची जोडही दिल्याचे लेखकाने या पुस्तकातून स्पष्ट केले आहे.

एकूणच नागरिकांना आत्मरक्षणासाठी आणि सन्मानासाठी राज्यघटनेने दिलेल्या हक्क आणि अधिकारांबरोबरच कर्तव्याच्या करून दिलेल्या जाणीवेमुळे हे पुस्तक वाचनीय व उद्बोधक ठरेल अशी खात्री वाटते.  

प्रा.डॉ. बी. आर. जोशी

 लेखक हे भारतीय राजघटनेतील मूल्यांचे अभ्यासक आहेत.