सर्वसाधारण 

  1. home
  2. सर्वसाधारण 
  3. क्रांतीज्वाला
90 100
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

क्रांतीज्वाला

By:

Book Details

  • Edition:2018
  • Pages:92 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:NA--

या पुस्तकातून लेखकाने अपंगांचे सामाजिक आणि भावनिक चित्र संवेदनशीलपणे मांडले आहे. वस्तूस्थितीवरील लिखाण हे लेखकाच्या लेखनशैलीचे वैशिष्ठ्य म्हणता येईल.प्रस्तुत कादंबरीतून लेखकाने अशाच अपघाताने अपंगत्व आलेल्या स्त्रीच्या खडतर जीवनाबद्दल वर्णन केले आहे.

समाजातल्या विकृत मनोवृत्तीला तोंड देताना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यांवर तिला आलेले अनुभव थरारकच आहेत. रोज वर्तमानपत्रांमधुन आणि बातम्यांमधून वाचायास मिळणाऱ्या घटनाच तिच्या आयुष्यात घडल्याचं वास्तव वाटणारं चित्र लेखकाने वाचकांसमोर उभे केले आहे.

सहनशीलतेला पण ठराविक एक मर्यादा असते,त्यापुढे एक स्त्री कशी हतबल होते हे वर्णन लेखकाने अतिशय परिणामकारक वर्णिले आहे.स्त्रीकडे वाईट नजरेने पाहण्याची हीन सामाजिक प्रवृत्ती आणि स्त्रीवर आत्याचार होणं हे लेखकाच्या मते समाजाचे अपयश आहे. कादंबरीतून वर्णन केलेले प्रसंग आणि घटना या वास्तवात घडणाऱ्या घटनांशी मिळत्या-जुळत्या स्वरुपात वर्णन केल्याने लेखकाने समाजाचं विदारक सत्य समोर आणल्याचा भास होतो.