अर्थशास्त्र

  1. home
  2. अर्थशास्त्र
  3. अर्थशास्त्र संज्ञा कोश
1530 1700
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

अर्थशास्त्र संज्ञा कोश

By: डॉ. भीमसेन रंगाचार्य जोशी ,

Book Details

  • Edition:2015
  • Pages:1202 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-06-7

अर्थशास्त्रावरील हा कोश केवळ शब्दकोश किंवा रूढार्थाने ज्ञानकोश ही नाही. या दोहोंमधील एक अवस्था आहे.

सामाजिक शास्त्रांतील संज्ञांच्या स्पष्टीकरणाचा हा संक्षिप्त ज्ञानकोशच आहे. ज्ञानकोशातून ज्ञानप्राप्ती तर होतेच, शिवाय त्या भाषेची संस्कृती विकसित होऊन भाषेच्या अस्मितेचे भान येऊ लागते. मराठी भाषेमध्ये ज्ञानाच्या विविध शाखांशी संबंधित अशाप्रकारच्या कोशवाड्मयाची अधिकाधिक निर्मिती होणे गरजेचे आहे.

सामाजिक शास्त्रांमध्ये समाविष्ठ होणाऱ्या शास्त्रीय पारिभाषिक संज्ञा-संकलना-सिद्धांतांचे थोडक्यात स्पष्टीकरण देणाऱ्या कोशाची गरज आजही प्रकर्षाने जाणवते. प्रस्तुत कोश अर्थशास्त्र विषय घेतलेल्या पदवी व पद्युत्तर पातळीवरील विद्यार्थ्यांना, संशोधन करणाऱ्या विद्यार्थी व प्राध्यापकांना आणि केंद्र व राज्य स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरावा अशी आशा आहे. तसेच अभ्यासूंना, जिज्ञासूंना, औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील तज्ञांना, तळमळीच्या क्रियाशील कार्यकर्त्यांना, पत्र्कारांना उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

डॉ. भीमसेन रंगाचार्य जोशी