कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. महिला उद्योजक
220 245
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

महिला उद्योजक

प्रेरणादायक यशोगाथा By: अविनाश किरपाल ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:135 pages
  • Publisher: SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-866-0216-9

महिला असूनही स्वतंत्र उद्योगांची निर्मिती करून ते यशस्वीपणे चालविणाऱ्या आणि रोजगार र्निर्मितीला चालना देणाऱ्या, ज्या १० महिलांनी भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये हातभार लावला त्यांच्या अतुलनीय कामगिरीचे,लढाऊ वृत्तीचे, अनुभवांचे आणि यशापयशांच्या विचारांचे संकलन म्हणजे हे पुस्तक आहे.

या दिग्गज महिलांनी आपापल्या क्षेत्रात प्रचलित संकल्पनांपलीकडे जाऊन जी स्वप्ने पाहिली ती अथक परिश्रमांनी साकार ही केली. या खडतर प्रवासादरम्यान आलेल्या अडचणी आणि आव्हाने यांचे वर्णन या पुस्तकातून आले आहे, जे आजकालच्या युवा महिला पिढीस आदर्शनीय आहे. आपल्या यशाचे वाटेकरी म्हणून आपला सहकारीवर्ग,समाजघटक आणि कामगारवर्ग यांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले आहे.

भारतीय महिलांनी प्रस्थापित केलेले व्यवसाय आणि उद्योग यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे.देशात झालेल्या विविध क्षेत्रातील गुंतवणुकीत झालेल्या लक्षणीय वाढीमधे या महिलांद्वारे चालविलेल्या यशस्वी व्यवसायांचा संदर्भ या पुस्तकातून आला आहे.  देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती भक्कम करण्यात हातभार लावण्याची लक्षणीय कामगिरी या महिलांनी केली आहे. देशातील या महिला उद्योजकांच्या मते स्त्रीला भौतिक आणि मानसिक बंधनातून मुक्त करण्यासाठी तिचे शक्तीकरण हे एक प्रभावी अस्त्र आहे. 

या महिलांनी सुरवातीला प्रातिनिधिक स्वरुपात आणि कालांतराने समूहाद्वारे निर्माण केलेल्या विविध व्यवसायांची माहिती या पुस्तकातून लेखकांनी दिली आहे. त्यांनी केलेल्या या यशस्वी वाटचालीची अर्थकारण व रोजगारनिर्मितीच्या दृष्टीकोनातून असलेले महत्व पाहता त्यांनी मिळवलेले हे उल्लेखनीय यश आहे हे मानावे लागेल. कोणताही महत्वाचा उद्योग व व्यवसाय चालवताना हाती असलेली साधन सामुग्री, मनुष्यबळ आणि पायाभूत सोयीसुविधा यांचे उत्तम आयोजन आणि कार्यक्षम वापर कसा करून घ्यावा, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून विविध क्षेत्रातील या दिग्गज महिलांनी केले आहे.

अविनाश किरपाल

लेखक हे टाटा इंटरनँशनल लि. चे माजी उपाध्यक्ष आहेत.