अर्थशास्त्र

  1. home
  2. अर्थशास्त्र
  3. दैनंदिन व्यवहारासाठी अर्थशास्त्र
625 695
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

दैनंदिन व्यवहारासाठी अर्थशास्त्र

विकास क्षेत्रातील अभ्यासकांसाठी सुलभ मार्गदर्शन By: वी. शांताकुमार ,

Book Details

  • Edition:2019
  • Pages:272 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-532-8476-3

अर्थशास्त्राचे प्रसारमाध्यमातून मिळालेल्या ज्ञानातून पारंपरिक पद्धतीने अध्ययन न करता वेगळ्या पद्धतीने कसे करता येईल याचा आढावा या पुस्तकातून लेखकाने घेतला आहे. अर्थशास्त्र समजून घेताना त्यावर परिणाम करणाऱ्या सामाजिक आणि खाजगी क्षेत्राचा प्रभाव विचारात घ्यावा लागतो.

विकासाची व्याख्या बऱ्याच अंशी देशातील गरिबी आणि लोकसंखेच्या विविध स्तरांमध्ये असलेली आर्थिक विषमता या बाबींनी प्रभावित असते. लेखकाच्या मते अर्थशास्त्राचा आभ्यास करताना अशा घटकांचा आभ्यास होणे आवश्यक आहे. म्हणूनच या पुस्तकातून लेखकाने अर्थशास्त्रावर प्रभाव पाडणाऱ्या त्याच्या विविध शाखांचा आणि त्याद्वारे चर्चिल्या जाणाऱ्या आर्थिक व सामाजिक विकासावर आधारित संकल्पनांचा आभ्यास मांडला आहे,

लेखकाच्या पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील जलसंपदा अभियंता या पदावर कार्यरत असताना आलेल्या अनुभवातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.आर्थीक सल्लागार, शैक्षणिक तज्ञ आणि शासनाच्या विविध पदांवर आपले योगदान देताना आलेल्या अनुभवांचा आणि अडचणींचा या पुस्तकातून उल्लेख आला आहे.

देशाच्या आर्थिक उन्नतीमुळे उद्योग धंद्यांची भरभराट आणि त्याद्वारे उपलब्ध झालेल्या रोजगाराच्या संधी विकासाला चालना देतात. अर्थव्यवस्थेत झालेली उन्नती आणि आर्थिक विकास याद्वारे शासनाला करांच्या रूपाने उत्पन्न मिळून ते समाजभिमुख कार्यासाठी वापरता येते. लेखकाच्या मते दैनंदिन व्यवहारातून अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडणाऱ्या लोकसंख्यावाढ आणि आर्थिक विषमता या आव्हानांना याद्वारे यशस्वीपणे तोंड देता येऊ शकते. यातूनच अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास साधला जाऊन अल्प उत्पन्न असलेल्या गटांच्या मुलभूत गरजांवर सरकारला लक्ष केंद्रित करता येऊ शकेल.

अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अल्प विकासाचा आभ्यास करताना लेखकाने दरडोई उत्पन्नातील  अल्पवाढ आणि गुंतवणुकीसाठी भांडवलाचा असलेला आभाव विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणामकारक ठरला हे सोष्ट केले आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन आणि त्यांचा उपभोग यांच्या मागणी-पुरवठ्याशी असलेला संबंध देखील लेखकाने या पुस्तकातून पटवून दिला आहे.

वी. शांताकुमार

लेखक हे अझीम प्रेमजी विद्यापीठ, बेंगळूरू येथे प्राध्यापक आहेत.