कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. अधीर व्यवस्थापक
225 250
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

अधीर व्यवस्थापक

By: वाँल्टर व्हिएरा ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:154 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-866-0205-3

लेखकाने आपल्या व्यावसायिक सल्लागार या पेशातुन आलेल्या अनुभवाचा पुरेपूर वापर हे पुस्तक लिहिताना घेतल्याचे जाणवते. पुढच्याला ठेच मागचा शहाणा या म्हणीच्या विपरीत आपल्या चुकांमधून न शिकता दुसऱ्याला आलेल्या अनुभवातून व्यवस्थापन क्षेत्रात प्रभावीपणे अध्ययन करता येते, हे विचार लेखकाने पुस्तकातून मांडले आहेत.

सैद्धांतिक माहितीचा वापर करण्यापेक्षा वास्तवात येणारे अनुभव आणि सामोरे जावी लागलेली परिस्थिती याद्वारे व्यवस्थापनात आलेल्या समस्यांचे निराकरण प्रभावीपणे करता येते. लेखकाने पुस्तकातून सिद्धांतांचा आधार घेतानादेखील विषयाची मांडणी सोप्या भाषेत व रंजक पद्धतीने उदाहरणांचा दाखला देऊन केली आहे. व्यवस्थापन क्षेत्रामध्ये आजच्या विद्यार्थ्याला कमी काळामध्ये उच्च अधिकार पदापर्यंत पोहोचायची जिद्द असते. पण अशावेळी आपण इच्छित पदापर्यंत पोहोचलो नाही, तरी त्यासाठी आपण केलेल्या परिश्रमाला कमी लेखलं जात नाही, ही लेखकाची या पुस्तकातून आलेली भावना आहे.आजच्या तरुणाईपुढे आधुनिक युगामुळे असलेल्या विविध आव्हानात्मक संधी आणि त्यातून त्यांना स्वतःचे आवडते करिअर निवडण्याचे खूप पर्याय उपलब्ध आहेत. आपण करत असलेल्या कामाचा उच्चतम आनंद आणि त्यातून व्यवस्थापनास झालेला फायदा याचा ताळमेळ फार महत्वाचा असतो. यातूनच अशा गुणी कर्मचाऱ्यांना उद्योगांमधून प्रोत्साहन दिले जाते, त्यातून उत्पन्नवृद्धी आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतात, हा परस्पर संबंध लेखकाने प्रभावीपणे मांडला आहे.

आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रांमध्ये आश्चर्यकारक प्रगती झाल्यामुळे भावी काळात कोणत्या क्षेत्रात जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल याची तरुण व्यावसायिक आणि व्यवस्थापकांना जाणीव असणे महत्वाचे ठरते. आपली क्षमता आणि सामर्थ्य याची आपल्या ध्येयाशी सांगड घालणे कसे महत्वाचे असते हे लेखकाने स्पष्ट केले आहे.

व्यवस्थापकाच्या अंगी आवश्यक असलेल्या परिस्थितीचे किंवा  आव्हानांचे निरीक्षण, त्यावरचा आभ्यास आणि प्रभावी निर्णयांची अंमलबजावणी या  गुणांचा विकास आणि प्रभावी वापर किती महत्वाचा असतो हे विचार या पुस्तकातून आले आहेत. व्यवस्थापन क्षेत्रात असलेली अंतर्गत स्पर्धा,इर्षा आणि त्यातून कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होणारी मत्सर भावना यावर मात करणे आवश्यक असते, हे स्पष्ट करताना यात आपल्या वाया जाणाऱ्या समयाचा आणि शक्तीचा आपल्या व्यवसायावर कसा विपरीत परिणाम होतो, हे लेखकाने पुस्तकातून स्पष्ट केले आहे.

वाँल्टर व्हिएरा

लेखक हे आय.सी.एम.सी.आय. चे माजी अध्यक्ष आहेत.