कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. व्यवस्थापनबोध
225 250
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

व्यवस्थापनबोध

By: संजय कप्तान ,

Book Details

  • Edition:2014
  • Pages:214 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-81-927375-3-9

लेखकाने या पुस्तकाद्वारे व्यवस्थापनशास्त्र आणि संत रामदासांच्या 'मनाच्या श्लोकां'मधून आढळलेल्या मानवी मानसिकता, त्यांचे आरोग्य,त्यांचे होणारे सर्वांगी परिणाम यांची सांगड घालून या पुस्तकाची निर्मिती केली आहे.

विचार आणि व्यवहार या सूत्रांची व्यवस्थापन आणि श्लोकांतून आढळणारी समानता आणि त्यांचा मिलाफ हा लेखकाला या पुस्तकाच्या रूपाने अभ्यासाचा विषय वाटला. आजच्या व्यावहारिक जीवनातदेखील उपयुक्त अशी समर्थांची मुल्ये लेखकाला व्यवस्थापनातूनही आढळल्याचे पुस्तकातील लिखाणावरून जाणवते. व्यवस्थापनातून आणि समर्थांच्या श्लोकातून महत्तम हितांची जपणूक आणि तात्कालिन विचारांची सांगड प्रतीत होत असल्याचे लेखकाने वर्णन केले आहे.

बुद्धीनिष्ठ व्यवहार, प्रयत्नातील सातत्य आणि विवेकबुद्धी या रामदासांच्या श्लोकांतून आढळणाऱ्या मानवी वृत्तीशी निगडीत संज्ञांचे आधुनिक काळातील व्यवस्थापनाशी साधर्म्य आढळते. ते मांडताना विश्वविख्यात लेखकांच्या विचारांचा आणि समर्थांच्या तत्वज्ञानाचा अतिशय सोप्या भाषेत सहज, वाचनीय शैलीत मेळ घालण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केला आहे.प्रयत्नाला विवेकाची जोड असली कि जीवन सार्थकी लागते,या दासबोधातील विचारांचा आजही व्यवस्थापनावर प्रभाव आढळतो.

रामदासांच्या साहित्याचा आभ्यास केला तर संघटन आणि व्यवस्थापनशास्त्रांचा त्यांचा दांडगा आभ्यास लक्षात येईल.आजही व्यवस्थापनातून त्या साहित्याची मुल्ये जपली गेली आहेत.कौशल्य, सामंजस्य आणि विवेक ह्या व्यवस्थापनाच्या मुलभूत अंगांचा  समर्थांच्या साहित्यात फार पूर्वी असलेला अंतर्भाव आजच्या व्यवस्थापन विषयाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुउपयोगी ठरला आहे. ज्याप्रमाणे समर्थांच्या ओव्यांमधून वर्णिलेला महंत हा सर्वांगाने परिपूर्ण असा आहे तसेच आजच्या व्यवस्थापनातल्या नेतृत्वात असलेल्या उचित दृष्टी, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, सहकार्यांवर विश्वासभाव,आणि प्रसंगावधान या गुणांना अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे.

कौशल्यप्राप्तीमुळे स्वहित जपण्याबरोबरच इतरांच्या उपयोगी पडण्याचे सामर्थ्य ही आत्मसात होते. व्यवस्थापन क्षेत्रास बहुमुल्य असे हे विचार रामदासांनी त्यांच्या श्लोकातून आणि ओव्यांमधून पूर्वीच कसे मांडले होते याचे लेखकाने या पुस्तकातून सविस्तर वर्णन केले आहे.

संजय कप्तान