कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. दि विनिंग मॅनेजर
225 250
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

दि विनिंग मॅनेजर

व्यावसायिक यशाची शाश्वत तत्वे By: वाँल्टर व्हिएरा ,

Book Details

  • Edition:2016
  • Pages:253 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-515-0679-9

भावी करिअर म्हणून व्यवस्थापक पदाची अपेक्षा बाळगणाऱ्या आणि त्याची धुरा सांभाळणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक लेखकाने त्यांच्यासमोर ठेवले आहे. चरितार्थाचे साधन म्हणून सुरुवात होणारा हा प्रवास उच्च पदापर्यंत नेण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचा,संधींचा आणि कार्यक्षमता वाढवणाऱ्या साधनांचा यशस्वितेने कसा वापर करून घ्यावा, याचे मार्गदर्शन लेखकाने या पुस्तकातून केले आहे.

आत्मविकासाच्या,बढतीच्या आणि आपल्या ज्ञानात भर पाडण्याच्या दृष्टीने मिळालेल्या प्रत्येक संधीचा कसा खुबीने वापर करून घ्यावा, याचे जणू प्रशिक्षणच लेखकाने या पुस्तकातून दिले आहे, दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी आणि व्यवस्थापनात येणारे अडथळे यात असलेले साधर्म्य लेखकाने प्रभावीपणे मांडले आहे.

पुस्तकातून लेखकाने विविध किस्स्यांद्वारे स्वानुभवातून शिकण्यासारखे असलेले मुद्दे अधोरेखीत केले आहेत. आपल्याला ज्यातील उत्तम ज्ञान आहे अशा आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळणे हे आपल्या हातून पूर्णक्षमतेने काम होण्यासाठी किती आवश्यक आहे हा महत्वाचा विचार मांडला आहे. व्यवस्थापकपदासाठी मुलाखतीस जातांना करावयाच्या तयारीपासून ते प्रत्यक्षात त्या पदावर काम करताना येणाऱ्या अडचणी आणि आव्हाने यांचा सामना कसा करावा याचे मार्गदर्शनही या पुस्तकातून केलेले आढळते.

पदाचा गैरवापर आणि त्याद्वारे केलेली फसवणूक कशी अंगलटीस येऊ शकते हे स्पष्ट करताना लेखकाने मांडलेला, 'तुम्ही काहीजणांना बराच काळ फसवू शकता, पण सगळ्यांनाच सर्वकाळ फसवू शकत नाही' हा विचार अतिशय भावतो.

एकूणच आपण पूर्ण कार्यक्षमतेने आपले योगदान देऊ शकू अशा आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यवस्थापक म्हणून कार्य करीत असताना अंगी असलेल्या गुणांचा कसा प्रभावी वापर करून घ्यावा, आणि आपल्या कामाशी कसे प्रामाणिक रहावे  याबद्दलचे मार्गदर्शन, हे या पुस्तकाचे सार म्हणता येईल.

वाँल्टर व्हिएरा

लेखक हे आय.सी.एम.सी.आय. चे माजी अध्यक्ष आहेत.