कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. तुमचे प्रबंध लिखाण
490 545
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

तुमचे प्रबंध लिखाण

By: पाँल ऑलिव्हर ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:206 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-859-8542-3
  • Translated by:sushma deshpande

पीएचडी पदवी आभ्यासक्रमाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त मार्गदर्शन करणारे ठरावे. संशोधनासाठी आपण निवडलेल्या विषयाची मांडणी कशी असावी, त्यासाठी आवश्यक संदर्भ लिखाण कसे प्राप्त करावे. शोधनिबंधाचे शीर्षक,अनुक्रमणिका आणि शोधनिबंधाचा विषय यावरून आपल्या शोधनिबंधात अंतर्भूत झालेल्या गोष्टींची साधारण कल्पना यावी अशाप्रकारे त्यांचे स्वरूप असणे किती महत्वाचे असते हे लेखकाने या पुस्तकातून स्पष्ट केले आहे.

शोधनिबंध लिहावासा का वाटला आणि त्यासाठी नेमक्या विषयाची आपण निवड का केली, लेखकाच्या मते याची पूर्वकल्पना निबंधाच्या सुरवातीला स्पष्ट होणे गरजेचे असते.आपण निवडलेल्या विषयावरील केलेल्या संशोधनातून आपल्याला अपेक्षित असलेली सर्व माहिती अंतर्भूत झाली असेल आणि त्या निबंधाचे अध्ययन करणाऱ्या आभ्यासुंना तिचे सहज आकलन होईल अशी शोधनिबंधाची मांडणी आवश्यक असते.

स्वतः केलेल्या अध्ययनातून निवड केलेल्या विषयातील अपेक्षित सर्व बाबी आपल्याला स्वतःला पूर्ण आत्मसात झाल्या असतील तर त्यांचा आपल्या लिखाणातून कसा प्रभावीपणे वापर करता येईल हे लेखकाने या पुस्तकातून मांडले आहे. प्रबंधाचे अध्ययन, त्याचे सादरीकरण आणि त्याची यशस्वीता यादृष्टीने शोधनिबंधाचे सादरीकरण किती महत्वाचे असते हे या पुस्तकातून लेखकानेअधोरेखित केले आहे.

आधुनिक युगातील बदलत राहणाऱ्या मापदंडांना अनुसरून प्रबंधाचे सादारीकरण करणे ही त्याच्या यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे. टीकाकारांच्या मतांवर आणि सल्ल्यांवर अवलंबून राहणे हे प्रबंध प्रकाशित करण्यात अडथळा ठरू शकते, कारण नव्याने प्रबंध सादर करणारे पूर्वीच्या आभ्यासकांचे संशोधन पुढे नेत असतात,त्यातील उपलब्ध स्त्रोतांचा आणि संदर्भाचा मार्गदर्शकम्हणून अतिरेकी वापरही प्रबंध प्रकाशनावर विपरीत परिणाम करतो याबाबत लेखकाने या पुस्तकातून बहुमुल्य मार्गदर्शन केले आहे.

पाँल ऑलिव्हर