कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. मँनेजर ते सीईओ
225 250
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

मँनेजर ते सीईओ

उत्कर्षाच्या वाटेतले ९ टप्पे By: वाँल्टर व्हिएरा ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:214 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-528-0005-6

व्यवसाय सल्लागार या आपल्या असलेल्या पेशाच्या दीर्घ अनुभवातून निर्मिती झालेली ही अतिशय उपयुक्त साहित्य निर्मिती आहे. व्यवसायातल्या बढतीच्या संधींचा आपल्या कार्यक्षमतेने आणि कुशाग्र बुद्धिमत्तेने कसा प्रभावी वापर करून घ्यावा, याचे अध्ययन करायला लावणारे हे पुस्तक आहे.

संपूर्ण पुस्तक वाचनात लेखकाने व्यवसाय सल्लागार म्हणूनच नव्हे तर नोकरदारांना मार्गदर्शक म्हणूनही काही धडे दिले आहेत. पुस्तकाच्या सुरवातीलाच लेखकाने लायक व्यक्तीच्या डावलल्या जाणाऱ्या बढतीच्या संधींवर प्रभाव टाकणाऱ्या कार्यालयात हमखास आढळणाऱ्या राजकारणावर प्रकाश टाकला आहे, जे वास्तवच आहे. ते ग्राह्य धरूनच येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायच्या तयारीच्या अनुषंगाने लेखकाने मार्गदर्शन केले आहे.

स्वतःची कार्यक्षमता आणि कार्यक्षेत्र या दोन गोष्टी समजून घेतल्या कि येणाऱ्या आव्हानांना आणि मर्यादांना यशस्वीपणे तोंड देता येते, हे मत लेखकाने मांडले आहे. व्यवसायात येणाऱ्या मंदीच्या किंवा इतर संकटाना हाती असलेल्या सहकारी आणि कर्मचारी वर्गाला विश्वासात घेऊन कसे कुशलतेने तोंड द्यावे याबाबत लेखकाने उदाहरणासह मार्गदर्शन केले आहे. अशावेळी आलेल्या आपत्तीची जबाबदारी कुणा एका व्यक्तीवर ढकलून प्रश्न न सुटता कशी पेचाची परिस्थिती निर्माण होऊ शकते,हे सत्य ही मांडले आहे.

पूर्ण कार्यक्षमतेने काम होणे अपेक्षित असेल तर, कार्यालयीन सहकारी आणि कर्मचारी यांची निवड करताना योग्य व्यक्तींवर ती जबाबदारी सोपवणे अपेक्षित असते.अशावेळी चुकीच्या किंवा अन-नुभवी  व्यक्तीकडून अकार्यक्षम सहकारीवर्गाची झालेली भरती व्यवसायास किंवा कार्यालयास धोका पोहोचवू शकते.कार्यालयातील कर्मचारीवर्गाच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणारी यंत्रणा उपलब्ध नसणे हे देखील व्यवसाय परिणाम करणारे ठरते हे मत लेखकाने मांडले आहे.

प्रत्येकाला आपल्या व्यवसायाच्या वृद्धीच्या किंवा अधिकारातील सत्तेत सहभागी होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेसे वाटणे हे साहजिक आहे,पण त्यासाठीचे प्रयत्न करताना डोळ्यासमोर नकारात्मक विचारांच्या व्यक्तींचा आदर्श असू नये हे उचित मत लेखकाने मांडले आहे. हे कार्यालयाच्या सौदाहर्यपूर्ण वातावरणास कसे घातक असते ते स्पष्ट केले आहे. उचित उद्दिष्ठ आणि ध्येय समोर ठेऊन आत्मविकास कसा साधावा यासंबंधीचे महत्वाचे मार्गदर्शन लेखकाने या पुस्तकातून केले आहे.

स्वतःबरोबरच कार्यालयातील सहकारी वर्गास नव-नवीन गोष्टी शिकत राहण्यासाठी व ज्ञान हस्तगत करण्यासाठी सतत प्रोत्साहन देणे किती आवश्यक असते हे विचार या पुस्तकातून आले आहेत. पुस्तकाच्या उत्तरार्धात व्यवसायाच्या भावी प्रगतीच्यादृष्टीने निवृत्तीवेळी आपल्या हाती असलेले अधिकार योग्य आणि कार्यक्षम व्यक्तीच्या हाती सोपविणे कसे महत्वाचे आहे, हे लेखकाने स्पष्ट केले आहे.

वाँल्टर व्हिएरा

लेखक हे आय.सी.एम.सी.आय. चे माजी अध्यक्ष आहेत.