अर्थशास्त्र

  1. home
  2. अर्थशास्त्र
  3. सूक्ष्म अर्थशास्त्राचा सिद्धांत
418 465
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

सूक्ष्म अर्थशास्त्राचा सिद्धांत

By: पंकज टंडन ,

Book Details

  • Edition:2018
  • Pages:344 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-528-0418-4

जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या काही तज्ञ आणि जाणकार व्यक्तींच्या अर्थशास्त्रावर परिणाम घडवणाऱ्या व्यक्तिगत निर्णयकर्त्यांच्या कृतीचे, सूक्ष्म अर्थशास्त्रीय सिद्धांत या संकल्पनेद्वारे आढळून आलेले सकारात्मक बदल हा या पुस्तकाच्या अभ्यासाचा विषय आहे.

उपभोक्ता हा एक व्यक्तिगत निर्णयकर्ता असल्याने त्याच्या क्रयशक्तीला आणि घेतलेल्या वस्तूपासून मिळालेल्या उपयोगितेला सूक्ष्म अर्थशास्त्रीय सिद्धांतात कसे महत्व आहे हे लेखकाने या पुस्तकातून स्पष्ट केले आहे. त्याचे विवरण लेखकाने बीजगणिताच्या आणि आलेखांच्या माध्यमातून मांडले आहे.

उपभोक्ता हाच सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आभ्यासातला मुख्य घट मानून खरेदी आणि त्यातून त्याला मिळणाऱ्या फलाचा मागणीवर कसा परिणाम होतो, याचे विश्लेषण लेखकाने केले आहे. उपभोक्त्याला मिळणारी उपयोगिता ही उत्पन्न आणि व्यय यांच्या अंदाजपत्रकावर कशी अवलंबून असते,आणि त्याचे सूक्ष्म अर्थशासत्राच्या दृष्टीने कसे महत्व आहे,हे लेखकाने स्पष्ट केले आहे.

पुस्तकाच्या मध्यात लेखकाने विविध सिद्धान्तान्द्वारे सूक्ष्म अर्थशास्त्र या संकल्पनेचे महत्व अधोरेखित केले आहे. उपभोक्ता हाच अर्थव्यवस्थेचा मूळ पाया धरून त्याला आवश्यक वस्तूंचेच उत्पादन व योग्य वितरण याला असलेले महत्व लेखकाने पटवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

परस्पर पूरक तसेच एकमेकांस स्पर्धा करणारी उत्पादने आणि अर्थव्यवस्थेत मक्तेदारी असणारी उत्पादने यांद्वारे सूक्ष्म अर्थशास्त्राचा मूळ पाया असणाऱ्या व्यक्तिगत निर्णयकर्त्याचे हित जपले जाते का याचा आभ्यासही लेखकाने पुस्तकातून मांडला आहे.

पंकज टंडन

लेखक हे बॉस्टन विद्यापीठात प्राध्यापक आहेत.