इतिहास

  1. home
  2. इतिहास
  3. पर्यावरणीय अर्थशास्त्र
405 450
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

पर्यावरणीय अर्थशास्त्र

सिद्धांत आणि उपयोजन By: कटार सिंह व अनिल शिशोदिया ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:406 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-528-0397-2

पर्यावरणाचा मानवाला अनादी काळात केवळ पोटापाण्याचे साधन म्हणून उपयोग झाला. कारण त्याकाळी त्याची केवळ निसर्ग हीच ओळख होती. जसे मानवी जीवनाचे अधुनिकीकरण होत गेले तसे पर्यावरण हे चरितार्थाचे साधन बनले. एकेकाळी फक्त पोटापाण्याची सोय करू पाहणारा मनुष्यप्राणी पर्यावरणातूनच सुचलेल्या विविध शोध आणि संशोधनातून आपल्या प्रगतीकडे वाटचाल करू लागला.

पर्यावरणाचे अंग असलेली शेती, जंगल संपत्ती, पशुपालन आणि सामुद्राद्वारे मिळणारी संपत्ती यातून मानवाने आपला लक्षणीय विकास साधला. पण आज जल-सिंचन, मत्स्योत्पादन, शेती, आणि शेतीपूरक जोड व्यवसायांमुळे नैसर्गिक साधन सामग्री व पर्यावरणाचा ह्रास होत चालला आहे. वाढते औद्योगिकरणदेखील यात मोठा हातभार लावत आहे. त्यामुळे पर्यावरणावर आणि नैसर्गिक साधन सामग्रीवर आलेले संकट टाळण्यासाठी त्यांचा तारतम्याने आणि काळजीपूर्वक वापर होणे आवश्यक आहे. त्यातूनच पर्यावरणीय अर्थशास्त्राची संकल्पना उदयाला आली. पर्यावरण आणि त्यावर अवलंबून असलेले आर्थिक व्यवहार यांच्यातील परस्परसंबंधीचा आभ्यास करणारी विद्याशाखा अशी पर्यावरण अर्थशास्त्राची उचित व्याख्या पुढे आली.

लेखकाच्या मते, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था या परस्परावलंबी संज्ञा आहेत.आपण वर उल्लेखलेल्या पर्यावरणाच्या सर्व घटकांचा लेखकाने अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून सूक्ष्म आभ्यास आणि अध्ययन केल्याचे या पुस्तकातील लिखाणावरून समजते.

कटार सिंह व अनिल शिशोदिया

कटार सिंह- माजी संचालक इन्स्टििटयूट ऑफ रुरल मँँनेजमेंट आनंद (आयआरएमए) गुजरात.

अनिल शिशोदिया- इन्फर्मेशम/ रेफरन्स सर्विसेस डिपार्टमेंट ऑफ द कँँलगरी पब्लिक लायब्ररी कँँलगरी, कँँनडा