कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. कोण फसवते आणि कसे?
301 335
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

कोण फसवते आणि कसे?

घोटाळे, लबाडी आणि कॉर्पोरेट विश्वाची काळोखी बाजू By: रॉबिन बँनर्जी ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:314 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-859-8534-8

स्वताःच्या फायद्यासाठी  गैरमार्गाने समाजाच्या  किंवा एखादयाच्या विश्वासाला तडा देऊन आर्थिक घोटाळे आणि फसवणुकीचे प्रकार करण्याच्या वृत्तीमधे गेल्या काही दशकांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आढळते. या मानसिकतेमागे विनासायास आणि सोप्या मार्गाने पैसा मिळवण्याची वृत्ती आढळते. कायदा आणि त्याद्वारे शासन होण्याची भीती या वृत्तीला आजवर आळा घालू शकली नाही.

विविध शासकीय कार्यालयांमधून व्यावसायिक,उद्योजक,सरकारी अधिकारी आणि राजकारणी यांचे एकमेकांत बांधलेले हात आणि त्यामुळे आलेल्या निडरपणातून कैक घोटाळे आजवर घडले आहेत. आशावेळी भ्रष्टाचार आणि फसवणुकीच्या घटनांमधून स्व-रक्षण करण्यास मदत करणारे म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. छोट्या-मोठ्या प्रमाणात घडलेल्या आर्थिक गैरव्यवहारात कोणत्याप्रकारचे तंत्र वापरले गेले,स्वतःच्या राजकीय वजनाचा आणि वशिल्याचा,सरकारी अधिकारी वर्गाचा कसा खुबीने आणि बेमालूमपणे वापर केला गेला, याचं वर्णन या पुस्तकातून केलेलं आढळते.

गोर-गरीब जनतेच्या रेशनवर मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंपासून ते मोठमोठ्या सरकारी योजनाच्या आधारे हा भ्रष्टाचार कसा केला गेला, तो उघडकीस आणण्यामागे तपासयंत्रणांना कशा अडचणी आल्या याचे वर्णन या पुस्तकातून मांडले आहे.शेअर बाजारासारखा देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला हादरा देणारा घोटाळा हे एक उदाहरण तपशीलवार मांडले आहे.

आर्थिक गुन्हे आणि घोटाळे उघड करण्यासाठी ज्यांची निर्मिती झाली, ती सरकारी खातीच भ्रष्टाचाराने कशी बरबटली हे देखील या पुस्तकातून अधोरेखित केले आहे. सर्वात वेदनादायी म्हणजे वैद्यकीय क्षेत्रासारख्या मानवी जीवाशी संबंधित क्षेत्रातून चालणारा भ्रष्टाचार आणि पेशंटची फसवणूक होय. अशा क्षेत्रालासुद्धा भ्रष्टाचाराच्या भस्मासुराने वाळवीसारखे पोखरल्यावर माणसाने विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न पडतो. 

रॉबिन बँनर्जी

लेखक ३५ वर्षाचा अनुभव असलेले वरिष्ठ व्यावसायिक अधिकारी आहेत.