अर्थशास्त्र

  1. home
  2. अर्थशास्त्र
  3. भारतीय अर्थव्यवस्था
247 275
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

भारतीय अर्थव्यवस्था

स्थूल अर्थशास्त्रीय आढावा By: नीलांजन बानीक ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:268 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-859-8535-5

भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेची स्वतःची अशी भिन्न भूमिका आहे.ती समजून घेण्याच्या दृष्टीने विकसनशील देशात स्थूल अर्थशास्त्राचा प्रभावी वापर करून घेण्याविषयी पाठ्यपुस्तकातून अपेक्षित असलेली माहिती संकुचित स्वरुपात आढळते. त्यामुळे कधीकाळी अर्थशास्त्राविषयी विचारल्या गेलेल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या जिज्ञासेतून या पुस्तकाचे लेखन करायची कल्पना लेखकाला सुचली.

लेखकाने राष्ट्रीय लेखे सांख्यिकी, विविध नियोजन आयोग, रिझर्व बँक बुलेटीन आणि उपलब्ध आर्थिक सर्वेक्षण अशा अनेक स्त्रोतांमधील तथ्यांचा वापर या पुस्तकातून केला आहे.लेखकाने आपल्या व्यवसाय वृत्तपत्रांमधून लिखाण करतानाच्या अनुभवाचा आणि अध्ययनाचा पुरेपूर वापर करून घेतला आहे.

देशातील भाववाढ आणि वाढती बेकारी या देशाच्या अर्थकारणावर परिणाम करणाऱ्या विषयांचा स्थूल अर्थशास्त्राच्या सिद्धांतातून केलेला आभ्यास हा समृद्धतेकडे नेण्यास निश्चितच फायदेशीर ठरेल हे सिध्द करुन दाखवण्याचा लेखकाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. अर्थव्यवस्थेवर परिणामकारक अशा मागणी आणि पुरवठा या परस्पर पूरक अशा संज्ञांचे हाती असलेल्या आकडेवारीवरून आणि तिची कोष्टकातून मांडणी करून  विश्लेषण लेखकाने प्रभावीपणे मांडले आहे. या संकल्पनांच्या व्यवस्थापनाद्वारे दरडोई उत्पन्न आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होण्यास कसा हातभार लागू शकतो, हे लेखकाने प्रभावीपणे मांडले आहे.

पुस्तक लिहिण्यापूर्वी स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचादेखील लेखकाने बराच आभ्यास केल्याचे या पुस्तकात आभ्यासल्या गेलेल्या विविध अर्थशास्त्रीय संज्ञांचा विचार केला तर जाणवते.भारतीय अर्थव्यवस्थेची इतर विकसित आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांशी तुलना करताना लेखकाने विविध तखत्यांमधून विश्लेषण मांडले आहे, ज्यावरून देशाला विविध स्त्रोतांतून मिळणाऱ्या उत्पन्नाची, त्यात होणाऱ्या वाढीची, भांडवल निर्मितीची आणि बचतीची अर्थशास्त्राच्या दृष्टीने उपयुक्त असलेली आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. जिचा स्थूल अर्थव्यवस्थेचा आभ्यास करताना बहुमुल्य उपयोग होईल. अर्थव्यवस्थेच्या सुबत्तीकरणावर प्रभाव पडणाऱ्या भांडवलशाहीतून मिळणाऱ्या नफ्याचा आणि त्याच्या पुनर्गुंतवणुकीचा आजवरचा लेखाजोखादेखील लेखकाने अतिशय प्रभावीपणे आकडेवारीच्या आधारे मांडला आहे.

एकूणच स्थूल अर्थशास्त्राचा प्रचिलित पाठ्यपुस्तकांच्या आभ्यासक्रमातून न आढळणारा सारांश लेखकाने अर्थशास्त्रीय आभ्यासुंना या पुस्तकाद्वारे उपलब्ध करून दिला आहे.

नीलांजन बानीक

लेखक हे हैदराबादमधील महिंद्र इकोले सेन्ट्रलमध्ये असोसिएट प्रोफेसर आहेत.