माध्यम - पत्रकारिता

  1. home
  2. माध्यम - पत्रकारिता
  3. भारतीय माध्यम व्यवसाय
315 350
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

भारतीय माध्यम व्यवसाय

By: वनिता कोहली-खांडेकर ,

Book Details

  • Edition:2016
  • Pages:430 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-515-0721-5

विविध वृत्तपत्रांनी गौरवलेल्या या पुस्तकातून भारतीय मध्यम उद्योगासारख्या अवघड विषयाचे संशोधन अतिशय रंजकपणे मांडले आहे.व्यवसायातून नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या होतकरूंनी मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाचे वाचन करावे अशीच या पुस्तकाची मांडणी केली आहे.

परदेशातील प्रसार माध्यमांचा भारतीय माध्यमांशी केलेला तुलनात्मक आभ्यास देखील या पुस्तकातून आढळतो, तो या क्षेत्रात नव्याने उतरणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्वपूर्ण आणि उपयोगी आहे.विविध तख्ते आणि आकृत्यांद्वारे लेखिकेने माध्यम क्षेत्रामध्ये झालेली गुंतवणूक प्रभावीपणे मांडली आहे.

मोबाईल,इंटरनेट,डिजिटलायझेशन या आधुनिक शोधसाधन्नांमुळे या क्षेत्रास आलेली भरभराट या कोष्ठ्कातून स्पष्ट दिसते.अनेक डीटीएच चालकांनी प्रक्षेपणानुसार शुल्क आकारायचे धोरण अंगीकारून व्यवसाय वृद्धीबरोबरच प्रेक्षकांना परवडतील असे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर दिला. आणि तीच माध्यम क्षेत्राच्या भरभराटीला कशी कारणीभूत ठरली हे वर्णन लेखिकेने आकडेवारीसह मांडले आहे.

चित्रपट निर्मिती व्यवसायामध्ये मल्टिफ्लेक्सच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना विविध पर्यायांची उपलबद्धता निर्माण करून देण्यात आली.त्यात वापरल्या गेलेल्या प्रणालीचे विश्लेषणही या पुस्तकातून आकडेवारीसह या पुस्तकातून केले आहे. एकूणच भारतीय मध्यम व्यवसायाची होत गेलेली प्रगती, विविध शोध आणि त्यातून उपलब्ध झालेल्या आर्थीक आणि माध्यमांना अधिक समाजाभिमुख बनवणाऱ्या संधी कशा निर्माण झाल्या याचे वर्णन या पुस्तकातून प्रामुख्याने आढळते.

वनिता कोहली-खांडेकर

लेखिका मध्यम तज्ञ आणि  लेखिका आहेत. Buisness standerd आणि mid-day या वृत्तपत्रातून स्तंभ लेखन करतात.