इतिहास

  1. home
  2. इतिहास
  3. बोस बंधू आणि भारतीय स्वातंत्र्य
265 295
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

बोस बंधू आणि भारतीय स्वातंत्र्य

मर्मबंधातल्या आठवणी By: माधुरी बोस ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:264 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-859-8533-1

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या महत्वपूर्ण अशा दशकांचा परामर्श या पुस्तकातून घेताना लेखिकेने बोस बंधूंच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे वर्णन केले आहे.

लिखाणाला काहीसा भावनिक स्पर्श असलेल्या या  वर्णनात्मक पुस्तकातून अमियनाथ बोस यांच्या व्यक्तिगत आठवणींची हळुवार फुंकर घातल्याचा भास होतो.या पुस्तकातून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काही पैलूंवर नव्याने प्रकाश टाकला आहे. पुस्तकात काही दुर्मिळ छायाचित्रांचा ठेवाही वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.इतिहासाच्या आजवरच्या पुस्तकांमधून फारसं वाचावयास न  मिळालेलं बोस बंधुंचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान किती महत्वाचं होत हे या पुस्तकाद्वारे लेखिकेने वाचकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशात झालेल्या फाळणीच्यावेळी पंजाब आणि बंगाल या दोन महत्वाच्या प्रांतांच्या विभाजनाच्या मुद्यावरून बोस बंधूंनी अखेरीपर्यंत भारताची बाज्जू कशी उचलून धरली याचं प्रभावी वर्णन पुस्तकातून आढळ्तं. सुमारे तिन दशके कॉंग्रेसच्या सदस्यत्वानंतर शरद बोस यांनी सोशल रिपब्लिकन हा स्वतंत्र पक्ष स्थापन करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यास देलेली नवी दिशा ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात निर्माण झालेल्या निर्णायक टप्प्यास कशी पूरक ठरली याचे उद्बोधक वर्णनही पुस्तकातून लेखिकेने केले आहे. 

माधुरी बोस

लेखिका माधुरी बोस या शरद चंद्र बोस यांची नात आणि सुभाष चंद्र बोस यांच्या नात पुतणी आहेत. त्या लंडन येथील राष्ट्रकुल सचिवालायासोबत कार्यरत आहेत.