इतिहास- गांधी विषयक

  1. home
  2. इतिहास- गांधी विषयक
  3. खादी- गांधींच्या क्रांतीचे महाप्रतीक
445 495
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

खादी- गांधींच्या क्रांतीचे महाप्रतीक

By: पीटर गोंसाल्विस ,

Book Details

  • Edition:2019
  • Pages:287 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-532-8209-7

भावनात्मक आधार,कथानक मांडण्यातला नेमकेपणा  आणि त्यांना असल्या विविध दाखल्यांचे दुर्मिळ अश्या फोटो आणि ताख्त्यांसह केलेले विश्लेषण म्हणजे हे पुस्तक असे म्हणता येईल.

 खादी हे एक वस्त्रच नव्हते तर त्या द्वारे गांधीजींनी जनतेस सामाजिक राजकीय जबाबदारी पेलण्यासाठी दिलेले अदृश्य पण प्रबळ असे अस्त्र होते. परकीय सत्तेला आणि साम्राज्यवादाला अहिंसेच्या मार्गाने आव्हान देणे आणि स्वतःमधे हक्काच्या राज्यव्यवस्थेची आणि अर्थव्यवस्थेची पर्यायी बांधणी करणे हा स्वदेशी असलेल्या खादी वस्त्राच्या वापराचा मूळ उद्देश होता हे लेखकाने या पुस्तकातून नमूद केले आहे.

भारतातील विविध प्रांतामधल्या लोकांचे विविधपूर्ण पेहेराव पहाता, सामान्यातल्या सामान्य जनतेशी एकरूप होण्यासाठी संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणारे एक प्रतिक म्हणून खादीकडे पहाण्याचा गांधीजींचा  दृष्टीकोन लेखकाने या पुस्तकातून मांडला आहे. समाजात अढळणारया हिंदू जहालमतवाद, सनातनवाद, अस्पृशता या सगळ्या सामाजिक एकोप्याला घातक असणाऱ्या समस्यांवर परिणामकारक अस्त्र म्हणून अहिंसेच्या मार्गाने गांधीजींनी खादीचा कसा परिणामकारक वापर करून घेतला त्याचे सुरेख वर्णन या पुस्तकातून वाचावयास मिळते.

पीटर गोंसाल्विस

पीएच.डी., अध्यापक