कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. नेते आणि नेतृत्व विचार
175.5 195
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

नेते आणि नेतृत्व विचार

By: ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन ,

Book Details

  • Edition:2012
  • Pages:171 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-515-0701-7

नेतृत्व म्हटलं कि सहसा डोळ्यासमोर प्रभुत्व गाजवणारी,सतत उपदेशपर गोष्टी सूनावणारी एक संकल्पना डोळ्यासमोर उभी रहाते. लेखकाने या पुस्तकातून नेतृत्व गुणाची केवळ तीच वैशिष्ठ्ये न मांडता इतर गुणांचाही आभ्यास मांडला आहे.चर्चासत्रांमधून, परिषदांमधून जो संवाद आणि संपर्क साधला जातो तोच या पुस्तकाद्वारे साधण्याचा प्रयत्न केला आहे.

काही सर्वमान्य नेत्यांच्या नेतृत्वविषयक विचारांचे एकत्रित सादरीकरण या पुस्तकातून केलेले जाणवते.माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एन.आर.नारायणमूर्तींसारख्या यशस्वी उद्योजकाच्या उद्बोधक विचारांची मांडणी अतिशय खुबीने केले आहे.कंपनीच्या यशस्वीतेमागे नेतृत्व या गुणाचा किती मोठा हातभार आहे हे पुस्तकातील पहिल्या प्रकरणावरून समजते.

नेतृत्व गुणात अंतर्भूत असलेल्या संलग्न अशा सहकारीवर्गाच्या महत्त्वाकांक्षा वाढवणे, कर्मचारीवर्गास प्रोत्साहन देणे,धाडसीवृत्ती अंगीकारण्यास बळ देणे यावरही भर दिला आहे. हाती असलेल्या मानवी बळाद्वारे  कोणतेही उद्दिष्ठ साध्य करायचे असेल तर त्या सहकारी वर्गाचा विश्वास संपादन करणे आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवणे हा नेतृत्व क्षमतेचा प्रमुख गुण म्हणून उल्लेखला आहे.काही व्यासपीठांवरून तत्ववेत्यांनी मांडलेल्या नेतृत्व गुणाविषयीच्या विचारांचा परामर्श घेतला आहे.

एकूणच भविष्यातील संधी आणि आव्हाने डोळ्यासमोर ठेऊन आजकालच्या तरुणांमध्ये नेत्तृत्व गुण कसे वृद्धिंगत करता येतील यादृष्टीने या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे.

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन