सर्वसाधारण 

  1. home
  2. सर्वसाधारण 
  3. हर्णेचा सागरपुत्र-शिवा तांडेल
135 150
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

हर्णेचा सागरपुत्र-शिवा तांडेल

By: श्रीराम विष्णू साठ्ये ,

Book Details

  • Edition:2016
  • Pages:140 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-10-4

कोकण किनाऱ्यावरचं जीवन, मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या कोळीबांधवांच्या सरळ, निरपेक्ष पण धाडसी जीवनाचे वर्णन लेखकाने या पुस्तकातून केलेले आढळते.

विशेष ओळखपाळख नसलेल्या परक्या व्यक्तीबद्दलही कोकणी माणसाला किती आपुलकी असते याची प्रचीती या पुस्तकातून येते. कोकणी माणसाच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांचे सत्यवर्णन समोरच घडत असल्यासारखे जाणवते.

पुस्तकात वर्णन केलेल्या व्यक्तिरेखा आहे तशा डोळ्यासमोर उभ्या राहतात. कथानकाचा नायक असलेल्या शिवा तांडेल याच्या घरात घडणाऱ्या छोटया-छोटया घटनां मधून वास्तविक दर्शन घडते.

समुद्र हेच मायबाप असल्याची आणि त्याच्या उपकारांची जाणीव असल्याची कोळी समाजात असलेली भावनाही लेखकाने पुस्तकातून भावनिकतेने उतरवली  मासेमारीसाठी समुद्रात पडलेल्या नौकेवरच्या खलाशांना ज्या कठीण प्रसंगांना सामोर जावं लागतं त्याचं आणि आपल्या धाडसी,निडरवृत्तीने ते त्यांना कसे सामोरे जातात, याचं रोमहर्षक वर्णन अंगावर काटा आणतं. 

श्रीराम विष्णू साठ्ये