समाजशास्त्र

  1. home
  2. समाजशास्त्र
  3. भारतीय समाजशास्त्र: समस्या आणि आव्हाने
255 285
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

भारतीय समाजशास्त्र: समस्या आणि आव्हाने

By: एल. थारा भाई ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:273 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-859-8537-9

वर्तमानकाळातील समाजशास्त्रज्ञांना इतर क्षेत्रांमधील ज्ञानाचा विकास आणि वाढीच्या संदर्भात ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते, ती लेखकाने या पुस्तकातून ठळकपणे निदर्शनास आणून दिली आहेत. प्रस्तुत पुस्तकातून समाजशास्त्र विद्याशाखेच्या वाढीची विस्तृत चर्चा केलेली आहे. त्याचप्रमाणे समस्या आणि आव्हाने याबद्दल समाजशास्त्रज्ञांची मते मांडण्यात आली आहेत.

आपल्या निबंधात डी. पी. मुखर्जी यांनी भारतीय संस्कृतीची घडी प्रस्थापित करण्याची महत्वपूर्ण आणि तातडीची कामगिरी पार पाडण्याकरिता समाजशास्त्र हा उपयुक्त आभ्यास आहे, असा विचार मांडला आहे.त्यांची मते दुसरा कोणताही आभ्यास भारताच्या प्रगतीचा घोषित हेतू असणाऱ्या मानव जातीच्या सक्रीय जाणीवेत एवढे योगदान देत नाही. विद्यापीठांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राबरोबरच समाजशास्त्राचा आभ्यासक्रम अंतर्भूत करून त्याचे महत्व मान्य केले आहे. असे असूनही समाजशास्त्राचा आभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प आहे.

महाविद्यालायांमधून आणि विद्यापीठातून या विषयाचा सखोल आभ्यास असणारे खूप थोडे प्राध्यापक आहेत ही खंत मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी अमेरिका आणि रशिया सारख्या आधुनिक राष्ट्रांशी सांस्कृतिक आणि व्यावसायिक दृष्टीने तुलना करताना परराष्ट्र धोरण, मुक्त व्यापार, आधुनिक संस्कृती आणि त्यातून आपले हितसंबंध कसे जप्त येतील यावर त्यांच्या निबंधातून प्रकाश टाकला आहे.

आर. एन. सक्सेना यांच्या मते वाढती लोकसंख्या ही मागासलेपणा आणि गरीब समाज यांच्यावर परिणामकारक ठरू पहात आहे. अशा समजामुळे राष्ट्राच्या दरडोई उत्पन्नावर परिणाम होऊन बहुतांश जनता ही हलक्या दर्जाचे जीवन जगत आहे.  सक्सेनांच्या मते, विकास या संकल्पनेवर परिणाम करणारे असे अनेक घटक असल्याने विकासाची नेमकी व्याख्या करणे अवघड आहे. कारण विकासाच्या प्रक्रियेत देशाची प्रगती ही आधुनिकीकरण म्हणून परिचित असलेल्या बाबींच्या दृष्टीकोनातून मोजली जाते.

रामकृष्ण मुखर्जी यांच्यामते भारतीय समाजशास्त्र हे आज ज्या विकासाच्या कसोटीला पोहोचले आहे, ति अवस्थाच समाजशास्त्राच्या सध्याच्या समस्यांचे मूळ आहे. या समस्यांवर प्रकाश टाकताना त्यांनी इतर देशांमधे झालेल्या सामाजिक चळवळींपासून ते परस्पर तणावाच्या संबंधांपर्यंत बाबींचा विचार केलाआहे.

भारतासारख्या विकसनशील देशामध्ये काही सामाजिक प्रथा आणि परंपरांचा उल्लेखही निबंधकारांनी या पुस्तकातून मांडला आहे.

एल. थारा भाई