राज्यशास्त्र 

  1. home
  2. राज्यशास्त्र 
  3. जागतिक जिहाद आणि अमेरिका
468 520
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

जागतिक जिहाद आणि अमेरिका

By: ताज हाश्मी ,

Book Details

  • Edition:2019
  • Pages:336 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-532-8241-7

पाश्चात्य आणि आशियाई देशांसह संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या दहशतवादरुपी राक्षसाची झळ अमेरिकेपर्यंत पोहोचली. विविध प्रगत शस्त्रास्त्रांनी समृध्द असलेल्या महासत्तेच्या सौरक्षण यंत्रणेस भेदून या महासत्तेलाही दहशतवादाने हादरे दिले. 

कधीकाळी याच पाश्चात्य देशांनी  जगाला स्वतःच्या स्वार्थासाठी कधी युद्धांच्या तर कधी दहशतवादाच्या खाईत लोटल्याचे वास्तव लेखकाने या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर मांडले आहे,,अचानक दहशतवादरुपी भस्मासुराचा गेल्या काही दशकांमध्ये जो आगडोंब उसळला त्याने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात ओढले. याच दहशतवादाने मानवी संपत्तीबरोबरच नीतीमूल्यांची समीकरणेच बदलून टाकली. त्यात यातून अमेरिकेसारखी महासत्तासुद्धा सुटली नाही.

शस्त्रास्त्रांच्या बळावर पाश्चात्य देशांनी आणि त्यातूनही अमेरिकेने अनेक देशांशी युध्द केले किंवा युद्धांना एक प्रकारे मदत केली. त्यातूनच धार्मिक रंग आलेला दहशतवाद कसा फोफावत गेला याचं विस्तृत वर्णन या पुस्तकातून लेखकाने मांडले आहे.

 

ताज हाश्मी