समाजशास्त्र

  1. home
  2. समाजशास्त्र
  3. भारतातील सामाजिक चळवळी
270 300
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

भारतातील सामाजिक चळवळी

By: घनश्याम शाह ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:283 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-859-8536-2

या पुस्तकातून लेखकाने व्यावसायिक,जातीजमाती,शैक्षणिक तसेच पर्यावरणासारख्या प्राकृतिक स्तरांवर भारतात वेळोवेळी घडलेल्या चळवळीचा लेखाजोखा मांडला आहे.त्याद्वारे लेखकाने या पुस्तकात समाज रचना, सामाजिक प्रक्रिया, समाजात असलेल्या विविध संस्कृती आणि समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सहभागाचा एकमेकांशी पूरक असलेला  परस्पर संबंधाचा आभ्यास वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.
स्वातंत्रोत्तर काळामध्ये झालेल्या चळवळीच्या आभ्यासाबरोबरच या चळवळीद्वारे समाजातल्या विविध वर्गांच्या, गटांच्या चळवळीं क्षमता आणि मर्यादा यांचे विवेचन या पुस्तकात लिहिलेले आढळते. सुरवातीला विविध समाज घटकांनी उत्स्फुर्तपणे चालवलेल्या चळवळीना कालांतराने संघटनात्मक रूप येऊन त्यांची व्याप्ती वाढली. हळूहळू सगळा समाजच विविध चळवळीच्या रूपाने समाज परिवर्तनाकडे पाहू लागला. सामाजिक किंवा संघटनात्मक चळवळीतून वैयक्तिक हितसंबंधाचे रक्षण करण्याची कल्पना यातूनच पुढे आल्याचं उद्बोधक वर्णन लेखकाने या पुस्तकातून केले आहे.
थोडक्यात या पुस्तकातून लेखकाने समाजातल्या विविध स्तरांकडून वेळोवेळी स्वतःचे अधिकार, हितसंबंध जोपासण्यासाठी आणि ते सुरक्षित करण्यासाठी चळवळीचा कसा आधार घेतला गेला याचे व त्यांच्या परिणामांचे वर्णन केले आहे.

घनश्याम शाह