वैज्ञानिक

  1. home
  2. वैज्ञानिक
  3. उत्क्रांती -
360 400
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

उत्क्रांती -

एक वैज्ञानिक अंधश्रद्धा By: अरुण गद्रे ,

Book Details

  • Edition:2021
  • Pages:260 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-41-8

उत्क्रांती हा विषय जरी कुठे चर्चेच्या निमित्ताने मांडला गेला.तरी सर्वसामान्यत: त्यावर फारसे भाष्य करण्याबाबत समाजामध्ये उदासीनता दिसून येते.कारण आज मानव ज्या आधुनिक जगात वावरतोय त्याचा आधार जरी कधीकाळी अश्म युगात जन्म झालेल्या आणि वानर प्रजातीपासून उत्पत्ती झालेल्या मानवी जीवनात वेळोवेळी घडत गेलेली  उत्क्रांती आहे हे त्रिवार सत्य आहे.

या पुस्तकाद्वारे लेखकाने जगप्रसिध्द शास्त्रज्ञांनी आपल्या विविध संशोधनानी मानवी जीवनात घडवून आणलेल्या बदलांचा दोन्ही बाजूंनी आभ्यास करून, त्या संशोधनाला कुठेही कमी न लेखता, आजच्या संशोधनाने मानवी जीवन कसे सहज आणि आधुनिक केले याची मांडणी केली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या आजारावर गुणकारी ठरणाऱ्या घटकाचा शोध जरी १८व्या शतकात लागला असला तरी त्यापासून प्रभावी औषध बनता बनता १९सावे शतक उजाडले. लेखकाने विविध क्षेत्रातल्या संशोधनाचा असा तुलनात्मक आभास वाचकांच्या समोर मांडला आहे. हे पुस्तक वाचताना उत्क्रांती या संकल्पनेबद्दल आपल्या मनात असलेली अनास्थेची भावना निश्चित दूर होण्यास मदत होते.

अरुण गद्रे